माझे काका डॉ. द. वि. जोग औरंगाबादला इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी चांगला परिचय होता.
त्यांनी (माझ्या काकांनी) आंबेडकरांवर लिहिलेली कविता खालीलप्रमाणेः
डॉ. आंबेडकरांस..
बाल्यापासुनी तू छळास गिळिले त्या कालकूटासम
त्या दुःखे जळतां गळा सहजचि तू क्रुद्ध रुद्रोपम
त्रैवर्ण्य-त्रिपुरांतका यश तुझे गातील भावी जन
त्वत्क्रोधाग्निबळेच की निरसले अस्पृश्यता-लांछन - १
सर्व ब्रह्म कुणी कथेत कथिती, कोणी दया प्रार्थिती
कोणी अर्थप्रधान ऐक्य वदती, संघात शक्ती कुणी
भीष्माच्या सम मुग्ध कोणी बसती वा सांगती सांत्वन
मांडी फोडुनी तूच एक वधिला वैषम्य-दुर्योधन - २
जाळुनी स्मृतिला तुवा उजळिली मानव्य-धर्मस्मृती
धर्मी धारण हेच तत्त्व पहिले तू आग्रहे सांगशी
दक्षाचा मख नाशुनीही ठरला तो शंभू यज्ञेश्वर
हिंदू धर्म निखंदिताही ठरशी तू धर्मसंरक्षक - ३
Friday, July 24, 2009
मृत्युचिन्ह
प्रिय मृत्यो,
नश्वर जगातल्या एकमेव खऱ्या मित्रा,
लोक तुला काय काय म्हणतात ....
आयुष्य थांबवतोस म्हणून पूर्णविराम .
पुनर्जन्माच्या संकल्पनेनुसार अर्धविराम ;
नंतर येणाऱ्या अनेक जन्मांतला एक संपला म्हणून स्वल्पविराम ,
पुढल्या जन्मास जोडणारा म्हणून संयोगचिन्ह -
अर्ध्यातूनच उठवलंस तर अपसारणचिन्ह ---
विशेष असलास तर 'एकेरी अवतरणात'
अतिविशेष असलास तर "दुहेरी"
जगातलं
न थांबलेलं आश्चर्य उद्बारचिन्ह !
अन न सुटणारं कोडं : प्रश्नचिन्ह ?

धागे उभे आडवे..
मनुष्य अनुभवाच्या साठ्यातून वेचून लिहितो म्हणतात. 'म. ला. व्यं. ' (महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अर्थात पुलं ) च्या लिहिण्यावर इतकं लिहिलं गेलंय की आणखी लिहिणं म्हणजे पांढऱ्यावर (आणखी) काळं करणं..
पण तरीही पुलंचे वाङ्मय वाचलेल्या वाचकास त्यांच्या लिहिण्यात अटळ पुनरावृत्ती आढळते. तसे पुलं म्हणजे 'उत्कट, भव्य त्या सगळ्यासमोर झुकणारे' - गुण गाईन आवडी, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत या सगळ्या पुस्तकांतून हा गुण दिसून येतो.
हे सारं साहित्य पुन्हा पुन्हा वाचताना त्यांचे एकमेकांत गुंतलेले धागे मिळाले, त्यांची गाथा -
सहजच सांगायचं तर त्यांचे फणसळकर मास्तर (गणगोत) थेट चितळे मास्तरांशी नातं सांगतात. फरक इतका की मास्तर नसलेल्या फणसळकरांना चितळे मास्तरांच्या माध्यमातून पूर्ण मास्तरकीचा दर्जा दिला. बाकी ऐवज तोच - स्वातंत्र्यपूर्व काळातले ध्येयवादी विचार - मुलांचं कल्याण व्हावं ही निरपेक्ष आणि मनोमन इच्छा - शेवटची ओळ पुरी करण्यास देणे हाही एक असाच जोडणारा दुवा.
त्यातून आभारप्रदर्शनाचा प्रसंग बापू काणेच्या आभारप्रदर्शनाची उगाचच आठवण करून देतो.
रामूभय्या दातेंच्या लेखात पुलंनीच त्यांच्या (दातेंच्या) व्यक्तिरेखेवरून 'तुझे आहे' चा काकाजी घेतला आहे का अशी विचारणा झाल्याचे म्हटले आहे. साहित्यिक चमत्कृतीतून त्यांनी हे नाकारले तरी काकाजींवरचा रामूभय्यांचा ठसा पुसताच येत नाही. तो इंदोरचा 'मझा' - दिलदारी, जीवन रसरसून जगण्याची इच्छा - सगळे षोक करून कसलाही 'शोक' न करणारा माणूस - बस बस; अजून काही सांगायची गरज नाही..
ब. मो. पुरंदरे अर्थात हरितात्या - दोघं इतिहास जगणारी माणसं, दोघेही इतिहासाला रुक्ष रुमालात बांधून न ठेवता प्रत्येक क्षणाची महती आपल्या खास शैलीत सांगून अंगावर रोमांच उठवणारे.. पुरंदरेंच्या व्यक्तिचित्रात पुलंच्या आजोबांचे (ऋग्वेदी) संदर्भ घातले की हरितात्या तयार..
चिंतामणराव कोल्हटकर खुशीत आले की समोरच्याला 'मिस्टर' असं संबोधत हे वाचताना परोपकारी गंपू नजरेआड करता येणार नाही.
*%&#* .. अर्थात रावसाहेब - रांगडे, कोणाचीही भीडभाड न बाळगणारे व लौकिकार्थानं 'फुकट' गेलेले. त्यांचा रंग बहुदा 'बबडू'त मिसळला आहे. बबडू घरी भेटल्यामुळे त्याची भाषा जरा नियंत्रणाखाली असते; रावसाहेबांचा सगळाच व्यवहार खुल्लमखुल्ला... वरून रांगडे व रोखठोक पण आत कुठेतरी शैशव जपणारे व लहान मुलाच्या उत्सुकतेने जगाकडे बघणारे - बहुदा दोघांचेही शैशव उद्ध्वस्त झाल्यानं...
अंतू बर्वा हा पुलंचा तुफान लोकप्रिय झालेला स्वयंभू विनोदी प्रकार. याचं मूळ कुठे असेल याची उत्सुकता मलाही होती, आणि गणगोतमधील आप्पा (पुलंचे श्वशुर) वाचल्यावर तेही कोडं सुटलं. त्यातूनच मग 'जावयबापू'ची गाठही उकलली. जावयाच्या भूमिकेतून जे कोकण बघितलंय तसंच नेमकं अंतू बर्व्यात उतरलंय यात शंका नाही.
शेवटला उल्लेख 'दिनेश'चा. पुलंनी त्यांच्या मेव्हण्याच्या लहानशा मुलाचं व्यक्तिचित्र रेखाटण्यामागे त्या मुलास त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर वाढवले हा इतिहास आहे, पण कदाचित आपल्या स्वतःच्या संसारवेलीवर न फुललेल्या फुलास पाहण्याची आसही त्यातून दिसते...

रूट थ्री
'हॅरॉल्ड अँड कुमार एस्केप फ्रॉम ग्वांटानामो बे' नावाचा एक सुमार चित्रपट मागल्या वर्षी येऊन गेला.सहकुटुंब न पाहण्याइतपत वाईट अशा या चित्रपटाच्या अंती मात्र एक फार आगळी कविता 'कुमार' या पात्राच्या तोंडी आहे.प्रसंग 'दिल चाहता है' मध्ये आमीर खान प्रीती झिंटाच्या लग्नाच्या (की साखरपुडा? ) वेळी येऊन आपल्या प्रेमाचा 'इजहार' करतो तद्वत आहे.तर ही कविता कुमार त्या वेळी ऐकवतो.या प्रसंगाचा यू-ट्यूब विडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहे -दुवा क्र. १
आणि ही कविता :
रूट थ्री
आय फिअर दॅट आय विल ऑलवेज बी
अ लोनली नंबर लाइक रूट थ्री
अ थ्री इज ऑल दॅटस गुड अँड राइट
व्हाय मस्ट माय थ्री कीप आउट ऑफ साइट?
बिनीथ द व्हिशियस स्क्वेअररूट साइन
आय विश इन्स्टेड आय वेअर अ नाइन
फॉर नाइन कुड थ्वार्ट धिस इव्हिल ट्रिक
विथ जस्ट सम क्विक अरिथ्मेटिक
आय नो आय विल नेवर सी द सन
ऍज वन पॉइंट सेवन थ्री टू वन (१.७३२१)
सच इज माय रिऍलिटी
अ सॅड इरॅशनॅलिटी
व्हेन हार्क! इज धिस व्हॉट आय सी?
अनादर स्क्वेअर रूट ऑफ अ थ्री?
ऍज क्वाएटली को-वॉल्टझीन बाय
टुगेदर नाउ वी मल्टिप्लाय
टु फॉर्म अ नंबर वी प्रेफर
रिजॉइसिंग ऍज ऍन इंटेजर
वी ब्रेक अवे फ्रॉम अवर मॉर्टल बाँडस
अँड विथ द वेव्ह ऑफ मॅजिक वॉंडस
अवर स्क्वेअर रूट साइन्स बिकम अंग्लूड
युवर लव्ह फॉर मी हॅज बीन रिन्यूड.
आणि ही कविता :
रूट थ्री
आय फिअर दॅट आय विल ऑलवेज बी
अ लोनली नंबर लाइक रूट थ्री
अ थ्री इज ऑल दॅटस गुड अँड राइट
व्हाय मस्ट माय थ्री कीप आउट ऑफ साइट?
बिनीथ द व्हिशियस स्क्वेअररूट साइन
आय विश इन्स्टेड आय वेअर अ नाइन
फॉर नाइन कुड थ्वार्ट धिस इव्हिल ट्रिक
विथ जस्ट सम क्विक अरिथ्मेटिक
आय नो आय विल नेवर सी द सन
ऍज वन पॉइंट सेवन थ्री टू वन (१.७३२१)
सच इज माय रिऍलिटी
अ सॅड इरॅशनॅलिटी
व्हेन हार्क! इज धिस व्हॉट आय सी?
अनादर स्क्वेअर रूट ऑफ अ थ्री?
ऍज क्वाएटली को-वॉल्टझीन बाय
टुगेदर नाउ वी मल्टिप्लाय
टु फॉर्म अ नंबर वी प्रेफर
रिजॉइसिंग ऍज ऍन इंटेजर
वी ब्रेक अवे फ्रॉम अवर मॉर्टल बाँडस
अँड विथ द वेव्ह ऑफ मॅजिक वॉंडस
अवर स्क्वेअर रूट साइन्स बिकम अंग्लूड
युवर लव्ह फॉर मी हॅज बीन रिन्यूड.
द फाउंटनहेड
द फाउंटनहेड
जग चालतं ते दोन प्रकारच्या माणसांनी. स्वयंस्फूर्त आणि परोपजीवी. जगाबद्दलचं हे वैयक्तिक निरीक्षण अगदी नेमक्या शब्दात मांडणारं पुस्तक म्हणजे आयन रँडचे (Ayn Rand) द फाउंटनहेड (The Fountainhead)!
Objectiveness व Individualism ची गंगोत्री मानल्या जाणाऱ्या या पुस्तकाचे जगभर लाखो चाहते आहेत. मला स्वतःला लेखिकेने मांडलेल्या काही संकल्पना पटल्या, माझ्या काही मतांना तिने दुजोरा दिला.
'फाउंटनहेड' चा अर्थ स्रोत, मूळ, source! जग बहुतांशी Second-Rate, म्हणजे परोपजीवी लोकांनी बनलेलं असतं. जगताना स्वतःच्या आत डोकावून मन सांगेल तसं (मनमानीपणे नव्हे) वागण्याचा प्रयत्न हाताच्या बोटावर मोजता येतील इतके लोक करतात. या स्रोताकडे बघण्याची सगळ्यांची हिंमत होत नाही. कारण ते अवघड असतं, त्रासदायक, कष्टदायी असतं. सर्वसाधारणपणे माणसाला frictionless - path of least resistance हवा असतो, आयतं मिळालेलं हवं असतं, स्वतःला कष्ट पडले नाहीत म्हणजे वाट्टेल ते स्वीकारायची तयारी असते. त्यामुळे प्रत्यक्ष कृतीचा - वैचारिक वा इतर- मक्ता दुसऱ्यांवर सोपवून माणसे आंधळेपणाने आयुष्य जगत असतात.
या कादंबरीचा नायक- Howard Roark- याचा लढा अशा मनोवृत्तीशी आहे. शिक्षणाने व पेशाने तो architect आहे, पण साचलेल्या, गतानुगतिक विद्येत त्याला काडीमात्र रस नाही. आपली वेगळी वाट चोखाळण्याकरिता लागणारी जिद्द त्याच्याकडे आहे. वाट पाहायची सहनशीलता आहे आणि त्याहून मोठी - जगाकडे पाहण्याची objective दृष्टी आहे. इथे कदाचित तो आदर्शवादी बनतो पण तो जे सांगतो त्यात अशक्य असं काहीच नाही.
उदाहरणार्थ गरीबांकरता कमी खर्चात गृहसंकुल बांधायची योजना तो हाती घेतो ती 'सामाजिक बांधिलकी' किंवा 'सामाजिक ऋण' म्हणून नव्हे तर त्याच्या कामातला तो एक आव्हानात्मक प्रश्न वाटतो म्हणून! गरीबांना त्याचा फायदा झाला तर त्याचं त्याला सोयरसुतक नाही, त्याच्या दृष्टीने त्याने एक आव्हानात्मक प्रश्न आपल्या बुद्धीच्या, हिंमतीच्या बळावर सोडवला इतकंच समाधान!

Subscribe to:
Posts (Atom)